Ad will apear here
Next
डावखुऱ्या व्यक्तींचा मेळावा
कोल्हापूर : बच्चन वेडे ग्रुप तर्फे बच्चन महोत्सव आयोजित करण्यात  आला आहे. यानिमीत्त डावखुऱ्या व्यक्तींचा मेळावा घेण्यात येणार आहे. 

या वेळी उपस्थित डावखुऱ्या  व्यक्तींसाठी विविध खेळ व उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात १५ वर्षांखालील डावखुऱ्या मुला-मुलींची हस्ताक्षर स्पर्धा, स्त्रिया व पुरुषांसाठी प्रत्येकी दोन या प्रमाणे वेगवेगळ्या ‘सेल्फी क्लिक्स’ स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे करओके बच्चन गाणी, डावखुऱ्या गप्पा-टप्पा, माहितीचे आदानप्रदान, इतर कलागुण असे विविध कार्क्रम डावखुऱ्या व्यक्तींसाठी आयोजित करण्यात आले आहेत. यातील विजेत्यांना  बक्षिसे देण्यात येतील. या कार्यक्रमात वयवर्षे १२ पुढील सर्वांना सहभागी होता येणार असून यासाठीची नावनोंदणी आवश्यक असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. मेळाव्याच्या ठिकाणी अल्पोपहारची विशेष सोय करण्यात आली आहे. 

कार्यक्रमाविषयी : 
दिवस : १३ ऑगस्ट, रविवार 
वेळ : सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत 
स्थळ : भांडारकर कला दालन, देवल क्लब, खासबाग, कोल्हापूर. 

नावनोंदणी 
दिवस : १३ ऑगस्ट, रविवार 
वेळ : सकाळी ११ पर्यंत 

वॉटसअप संपर्क : ९४२२४ १९७९० (नाव, आडनाव, व्यवसाय इ. नमूद करावे.)
 
प्रवेश शुल्क : २०।- रुपये 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZQLBF
Similar Posts
‘बच्चन वेडे’तर्फे बच्चन चित्रकला स्पर्धा कोल्हापूर : बच्चन वेडे कोल्हापुरी यांच्यातर्फे बच्चन महोत्सवांतर्गत शालेय मुला-मुलींसाठी महानायक अमिताभ बच्चन यांचे चित्र रेखाटण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या दोन गटांत देणार असून प्रथम तीन क्रमांकांना एक हजार, ५०० आणि ३०० रुपयांचे रोख पारितोषिक
‘डीकेटीई’ला ‘बेस्ट ट्रेनिंग अ‍ॅंड प्लेसमेंट’ पुरस्कार प्रदान इचलकरंजी : येथील वस्त्रोद्योग आणि अभियांत्रिकी तसेच व्यवस्थापनशास्त्राचे अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या ‘डीकेटीई’ संस्थेला वर्ल्ड एज्युकेशन समिटमध्ये बेस्ट प्लेसमेंट अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार ‘डीकेटीई’च्या वतीने एमबीए विभागप्रमुख प्रा. एस. आर. पाटील यांनी डॉ. रवी गुप्ता आणि कमिशनर डॉ
कमला महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण कोल्हापूर  : पन्नास कोटी वृक्ष लागवडीच्या अंमलबजावणी कार्यक्रमाचा भाग म्हणून ‘रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर’च्या सहकार्याने येथील कमला महाविद्यालयातील विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी वृक्षारोपण केले. या वेळी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, रोटरीचे
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षपदी क्षीरसागर कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर शहरातील श्री अंबाबाई देवीच्या देवस्थानासह पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे तीन हजार ६७ मंदिरांचे व्यवस्थापन १९६९पासून महाराष्ट्र शासनाची ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’ पाहते. या देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षपदी आमदार राजेश क्षीरसागर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language